हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवांपासून महाराष्टच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाना चांगलाच ऊत आला होता, मात्र त्यांनतर आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिले. त्यांनतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुढाकार घेतला असून आगामी काळात जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव ठाकरेंनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शिंदे गटाचे आमदार अपात्र झाल्यास अजित पवार भाजपमध्ये जाणार आणि सरकारमध्ये सामील होणार अशा चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यातच भर म्हणजे सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी मला आत्ता पण मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हंटलं होते. त्यामुळे चर्चाना आणखी उधाण आलं होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना मोठा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला जागा कितीही आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, असे आश्वासन ठाकरेंनी पवारांना दिल्याच्या चर्चा सुरु आहेत.
सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व आहे. परंतु महाविकास आघाडीचा नेता, नेतृत्व कोणीही करत असो, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल.अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी हरकत नाही असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना दिला आहे. सिल्वर ओकवर ठाकरे-पवार भेट झाली, त्यावेळी याबाबत बोलणी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई तक या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.