ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न घेता जगून दाखवा ; मुख्यमंत्र्यांचा बंडखोर आमदारांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांना घेऊन बंडखोरी केली. यानंतर आता मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज जिल्हाप्रमुखांची बैठक घेत आमदारांना थेट इशाराच दिला आहे. “बंडखोर आमदारांनी ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न घेता जगून दाखवावे. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचे पाप करण्यात आले आहेझाडाची फुलं न्या, फाद्या न्या, मुळ नेऊ शकत नाही. मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा, अशा थेट इशाराच ठाकरेंनी दिला आहे.

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मागर्दर्शनाखाली बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, बंडखोरांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि मी वर्षा निवासस्थान सोडले आहे कारण माझ्या मानेचे दुखणे होते म्हणून. पण मी संघर्ष सापडलेला नाही. तुमच्यासाठी मी आतापर्यंत मी काय कमी केले नाही. ज्या बंडखोर आमदारांना शिंदेनी फोडले त्यांच्यासाठी मी काय नाही केले. त्यांना नगर विकास सारखे महत्वाचे खातेही दिले. मात्र, त्यांनी बंडखोरी केली. ज्यांना माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे हि राक्षसी महत्वकांक्षा आहे.

जे आता मला सोडून गेले आहेत आता अत्याच्याबद्दल मला का वाईट वाटायला हवे. बाहेरच्या भाडोत्री लोकांमुळे आपल्यात वाद निर्माण केला जात आहे. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप झाल्यावर देखील मी त्यांना आपलेसे केले. मात्र, आता क्षमा नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल : उद्धव ठाकरे

आज पार पडलेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, बाहेरच्या भोडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. मला चांगले माहिती आहे की, हे सर्व भाजपाने केले आहे. त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे.

Leave a Comment