हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्र्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला. “राज्यात आम्हाला विकास करायचा आहे. त्यादृष्टीने काम हाती घेतले आहे. आरेतील जंगल वाचवले आहे. विकासाच्या नावाखाली काहींनी पाप करुन ठेवले आहे. ते सुधारायला वेळ लागेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित माझी आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, आज राज्यात पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून आम्हाला खूप विकास करायचा आहे. विकासाच्या दृष्टीने आम्ही अनेक कामे हाती घेतली आहेत. मात्र, आतापर्यंत विकासाच्या नावाखाली काहीहीं पाप करुन ठेवले आहे. ते सुधारायला वेळ लागेल. मात्र, ती आम्ही नक्की सुधारू, असे ठाकरे म्हणाले.
जागतिक पर्यावरण दिन | माझी वसुंधरा अभियान | सन्मान सोहळा – LIVE#माझीवसुंधरा #जागतिक_पर्यावरण_दिन https://t.co/qpTs4QguRp
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 5, 2022
राज्यात मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलेले नाही
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मास्क वापराबाबत विधान केले. ते म्हणाले की, राज्यात मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलेले नाही. मात्र, जनतेने काळजी घ्यावी. आता पंचमहाभूते आठवत आहेत, एवढी वर्ष विकासच भूत बसली होती, विकासाच्या आड कोणीही येत नाही. वृक्ष तोडून विकास होत आहे, हा कोणता विकास? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
माझी वसुंधरा अभियान पुरस्काराचे वितरण
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यंदाच्या वर्षी या अभियानात कराड पालिकेने चांगले काम केले. या उत्तम कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पालिकेचा गौरव करण्यात आला.