हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतील बंडखोरी मुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत 26 आणि 27 जुलै ला प्रदर्शित होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली जोरदार मुलाखत 26 आणि 27 जुलैला शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनातून प्रदर्शित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. या मुलाखतीत सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे मिळतील अस म्हणत संजय राऊत यांनी एकप्रकारे भाजप आणि शिंदे गटाला इशारा दिला आहे.
जोरदार मुलाखत..
सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..
महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली
मुलाखत..
सामना..26 आणि 27 जुलै. pic.twitter.com/U9pVYspDxE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
दरम्यान, आदित्य ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून लवकर उद्धव ठाकरे हे सुद्धा राज्याचा दौरा करतील अस संजय राऊत यांनी यापूर्वीच सांगितले होत. तत्पूर्वी सामनातील मुलाखतीत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार??? भाजप आणि शिंदे गटावर कोणत्या शब्दांत निशाणा साधणार?? शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.