उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे सेनापती!! ‘त्या’ खास खुर्चीने वेधले लक्ष्य

Uddhav thackeray sambhajinagar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) संयुक्त सभा पार पडली. राज्यात प्रथमच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे सभा घेत आपली एकीची वज्रमुठ दाखवून दिली. मात्र यावेळी स्टेजवरील त्या खुर्चीमुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झालं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा ठाकरेंचं नेतृत्व मान्य असलयाचे स्पष्ट झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच बडे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे यांनी हजेरी लावली होती. या सभेसाठी मंचावर उद्धव ठाकरेंसाठी खास खुर्ची ठेवण्यात आली होती. ही खुर्ची इतर नेत्यांपेक्षा खूपच वेगळी आणि ठाकरेंचं महत्त्व आणि नेतृत्व स्पष्ट करणारी होती. तसेच उद्धव ठाकरे यांची स्टेजवर एंट्री होताच फटाक्यांची सुद्धा जोरदार आतषबाजी करण्यात आली.

उद्धव ठाकरेंनी या सभेत सर्वात शेवट भाषण केलं. त्यांच्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी भाषणे केली. यावेळी काँग्रेस- राष्ट्र्रवादीच्या नेत्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा आदरपूर्वक आणि आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सेनापती म्हणून उद्धव ठाकरे यांहे नाव अप्रत्यक्षपणे अधोरेखित झालं आहे.