मुंबई: राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भेट घेतली आहे. आजच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वतः अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यांच्यासोबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेते देखील उपस्थित होते. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर प्रथमच ठाकरेंनी आज अजितदादांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना एक मोठा गुलदस्त देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर अजित पवार यांनी देखील एक खुर्ची देऊन उद्धव ठाकरे यांना बसण्यासाठी सांगितले. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ PTI या वृत्त संस्थेने ट्विट केला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बातचीत झाली. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. आपण अजित पवार यांची भेट घेतली. तसेच त्यांना नवीन पदासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर तुम्ही इतर गोष्टींकडे लक्ष नाही देतात चांगले काम करा. तिजोरीच्या चाव्या आता तुमच्याकडे आहेत” असा सल्ला देखील दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना सांगितले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
VIDEO | Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray meets Maharashtra Deputy CM Ajit Pawar in Mumbai.
(Source: Third Party) pic.twitter.com/38w33jcPnv
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2023
सध्या राज्यात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बंड केल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत देखील जाणकारांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काल देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आणि सत्ताधारी पक्षांची बैठक पार पडली आहे.
या बैठकीमध्ये 26 विरोधी पक्षांची आघाडी उभी करण्याचा निश्चय झाला आहे. तसेच या आघाडीला इंडिया असे नाव देखील काल देण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. येत्या निवडणुकीमध्ये भाजपला नमवण्यासाठी या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार केला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये काय खेळी पाहायला मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.