हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते. यावेळी दोघांकडून युतीचे संकेत देण्यात आले. दरम्यान आज पुन्हा दोघांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे युतीची चांगलीच चर्चांना केली जात आहे.
मुंबईतील फोर सिझन हॅाटेलमध्ये आज दुपारी 12 वाजता ठाकरे व आंबेडकर यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत येणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात देखील चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीयदृष्ट्या खूप महत्व प्राप्त झाले आहे.
नुकत्याच झालेल्या ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी प्रकाशआंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य करत युतीचे संकेत दिले होते. “आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. रामदास आठवले असे बोलले होते की तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असे ठाकरे यांनी म्हंटले होते.