Monday, January 30, 2023

संपूर्ण ‘ठाकरे सेना’ नागपुरात; कोणता बॉम्ब फोडणार??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून हिवाळी अधिवेशनाचा (Assembly Winter Session)दुसरा आठवडा सुरु होत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्यांनतर उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) त्यांची संपूर्ण सेना आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ नागपुरात पोचली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार आहे असा इशाराही दिला होता. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर हे सर्व एका विशेष विमानाने नागपुरात (Nagpur) दाखल झाले आहेत. दिशा सालियन प्रकरणातील AU या नावावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटानेही रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणजे आज संपूर्ण ठाकरे सेना नागपुरात दाखल झाली आहे .

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला इशारा देत उद्या आपण नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार आहे असं म्हंटल होत. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर दिसणार नाही असा पुनुरुच्चर सुद्धा त्यांनी केला होता. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुमच्या फायली तयार आहेत असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे संजय राऊत नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे.