हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून काल शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज केला होता. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याचा दमदार टिझर शेअर केला आहे. या टिझर मध्ये उद्धव ठाकरे केंद्रस्थानी असून बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील दसरा मेळाव्याचे छायाचित्रही दिसत आहेत.
नेमकं काय आहे उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीजर मध्ये –
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या टीजरमध्ये उद्धव ठाकरेंवर संपूर्ण फोकस आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या दसरा मेळाव्यातील चित्रही दिसत आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो मातांनो, अशी उद्धव ठाकरे यांनी केलेली भाषणाची सुरुवात दिसत आहे. निष्टेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार .. महाराष्ट्राची ताकद दिसणार अशी घोषवाक्य दिसत आहेत.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 30, 2022
वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तर टीझरवर एक नेता, एक झेंडा, एक मैदान… शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!, असं म्हटलं आहे.