हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असं वादग्रस्त विधान भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. भाजपमध्ये हे असे बौद्धिक दारिद्र्य असलेले मंत्री आहेत आस म्हणत त्यांनी पाटलांना फटकारले आहे. आज महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत विराट असा महामोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
जर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले नसते तर काय झालं असत त्याच उदाहरण आपल्या मंत्र्यांनी भीक शब्द वापरून दिले आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शेणमार सहन केला पण ते डगमगले नाहीत. त्यांनी लोकांना शिकवलं. जर आपणही शाळेत गेलो नसतो तर या मंत्र्यांसारखं शाब्दिक भीक मागत बसलो असतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. भीक मागितली असं म्हणणं म्हणजे वैचारिक दारिद्य आहे असेही ते म्हणाले.
https://www.facebook.com/AjitPawarSpeaks/videos/738553017936846/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB&ref=sharing
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पहिल्यांदा बघितला असेल. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही. तो महाराष्ट्रात घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा ठाकरेंनी दिला. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो असेही त्यांनी सांगितलं.
आजच्या या मोर्चात सर्व पक्ष एकवटले आहेत मात्र महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाहीत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभीमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नाही. असं कोणी करण्याचा प्रयत्न करेन, त्याला गुडघ्यावर खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही, ते बाळासाहेबांचे विचार होते असेही उद्धव ठाकरे म्हणाले .
यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. खरं तर मी त्यांना राज्यपाल मानतच नाही. राज्यपाल पदाचा मान ठेवतो, पण कोणीही बसावं आणि कोणालाही टपली मारावी हे आम्ही सहन करणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात आणि त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कोश्यारींचे कान टोचले.