मुंबई | गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे लोकसभा निवडणुक लढणार आहेत. अमित शहा यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे यांना बोलावून अमित शहा यांच्याकडून शिवसेना-भाजप युती मजबूत असल्याचे दाखवण्यात येत आहे.
अमित शहा हे ३० मार्चला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी काल उद्धव ठाकरे यांना फोने करून निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करत उद्धव ठाकरे यांनी गांधीनगर येथे येण्यास होकार दिला आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी लढत असत. मात्र, यावेळी त्यांना तिकीट देण्यात आले नाही.
२०१४ च्या निवडणुकीत युती होऊनही सत्तेत आल्यावर भाजप-शिवसेने कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सोरूच होते. शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप नेत्यांना वारंवार लक्ष्य करण्यात आले होते. भाजपकडूनही या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात होते. आता परत २०१९ च्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी पुन्हा हातमिळवणी केली आणि लोकसभा निवडणुकांना एकत्र सामोरं जाण्याचा निर्णय घेतला.
इतर महत्वाचे –
राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा
कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नाही, नरेंन्द्र पाटील यांचा उदयनराजेंना टोमणा
जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुलाबराव पोळ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज