उध्दव ठाकरे टाॅप फाईव्हमध्ये, तुम्ही उकिरडे फिरत बसल्याने भाजपाच्या एकाचाही समावेश नाही : संजय राऊत

0
54
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | देशात भाजपाची दिवसेंन- दिवस घसरण सुरू आहे. उध्दव ठाकरे यांचा टाॅप फाईव्हमध्ये समावेश असून भाजपाचा एकही मुख्यमंत्री यामध्ये नाही. कारण तुम्ही उकिरडे फिरत बसला हे सगळ्यांना माहित आहे. मग तुमचा का नंबर आला नाही. तुम्ही गर्दी करत केवळ राज्याला अडचणीत आणण्यासाठी काम करत असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले, पोलमध्ये उध्दव ठाकरे, ममता बॅंनर्जी, स्टॅलिन यांचे नंबर आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नंबर एकवर येतील. मात्र भाजपाचा एकही मुख्यमंत्री यामध्ये नाही. काही काळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टाॅप टेनमध्ये होते आता टाॅप फाईव्हमध्ये आहेत. अभिमान वाटतो, त्याचे काम कोव्हीड, विकासकामास सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे चालू आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष उध्दव ठाकरे काय करतात याकडे आहे.

आता भाजपा म्हणेल हा कोणता पोल परंतु यापूर्वी असे पोल तुमचे येत होते. तेव्हा तुम्ही ढोल, फटाके वाजवत होता. टाॅप पाईव्हत आले कारण त्यांचे काम आहे. तुम्ही बोलण्याने काय होते, जनतेला माहिती आहे. भाजपाची जनअशिर्वाद रॅली तिसऱ्या लाटेसाठी निमंत्रण देण्यासाठी असल्याचा आरोप संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here