हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याना बसला आहे. याठिकाणी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हवाई दौऱ्यावरून टीका केली होती. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींवर टीका करणारे मुख्यमंत्री ठाकरे हे दीड वर्षानंतरच बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांनी इतरांना हे शकवू नये,” अशा शब्दात पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ” मी फोटोसेशनसाठी या ठिकाणी आलो नाही. सिंधुदुर्ग व रत्नागिरीला या जिल्ह्यातील शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. अशा परिस्थिती मी हेलिकॉप्टरमधून नाही तर थेट जमिनीवर जाऊन शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. या त्यांच्या टोळ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली.
” देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर या दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी भेट देत पाहणी केली. त्यांना माहिती घ्यायची असते. मी कधी दौरा करणार हे कळू सुद्धा देणार नाही. मी प्रशासकीय भेट देत आढावा घेऊ शकत नाही,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही यावेळी पाटील यांनी समाचार घेतला.
“उद्धव ठाकरे यांनी जी पंतप्रधान मोदी यांनी हवाई पाहणी केलीय तर मी जमिनीवरून पाहणी करणार असे म्हंटल आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे कधी नव्हे तो दीड वर्षातून बाहेर पडले आहेत. त्यांनी इतरांना उपदेश करायचे काही कारण नाही. सरकार आल्यापासून मुख्यमंत्री हवेत आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नव्हते. ते आता जमिनीवर टेकले आहेत. याचा आम्हाला आनंदच आहे,” अशा टोलाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला.