हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकी संदर्भात घोषणा केल्यानंतर त्यांना शिवसेनेत घेण्याकडे हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान दोन दिवसापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करावा त्यानंतर आपल्याला उमेदवाराची दिली जाईल, अशी अट संभाजीराजेंना घालण्यात आली. त्यानंतर आज शिवसेनेनेत्यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना उद्या शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर 12 वाजता या, असे फोन करून सांगितले आहे.
संभाजीराजे छत्रपती हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज शिवसेनेने केली. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने त्याची मुंबईत एका हॉटेलमध्ये जाऊन भेटही घेतली. यावेळी शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासह इतर पदाधिकारी व संभाजीराजे यांची महत्वाची बैठकही पार पडली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट संभाजीराजे यांना फोन करत त्यांना वर्षा या निवासस्थानी शिवबंधन बांधण्यासाठी निरोप दिला आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली असून त्यावर दोन दिवसात चर्चा पार पडल्यानंतर अखेर शिवसेनेकडून संभाजीराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना मागील निवडणुकीच्यावेळी भाजपाने पाठींबा दिला होता. ते भाजप पुरस्कृत राष्ट्रपती शिफारसीने राज्यसभेवर निवडून गेले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवार म्हणून निवडून आणणार असल्याचा निर्णय घेतला आहे.