हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणूकीत घडलेल्या प्रकारावरून थेट भाजप व फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “शिवसेनेशी कुणीही गद्दारी केलेली नाही. उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शिव सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप व केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे.
५६ वा शिवसेना वर्धापन दिन – LIVE https://t.co/5tYYcJvwZG
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 19, 2022
आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको” असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हंटले.
अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ आहे
यावेळी उद्धव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? असा सवाल करत योजना म्हणजे मृगजळ आहे. नौकरी चालकाची पण नाव अग्निवीर, असे म्हणत आता भाडोत्री राजकारण्यांसाठी टेंडर काढा. अग्निपथ योजनेवरून कुणी तरुणांची माथी भडकवली. तरुणावर ती वेळ कार व कोणामुळे आली उद्या तरुण अंगावर आले, तर झेलणार कोण? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.