ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत शिवसेना उमेदवार डॉ. राहुल पाटील आणि पालममध्ये गंगाखेड मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल बोलतांना ठाकरे म्हणाले की ते थोरात आहेत तर मी जोरात आहे. थोरतांच्या बाजीप्रभूवरील वक्तव्याचा ही उद्धव यांनी यावेळी समाचार घेतला. “अरे तुम्ही कसले बाजीप्रभू, बाजीप्रभूंनी महारांजांसाठी बलिदान दिले, तुम्ही तर सोनिया गांधीसाठी लढताय. तुम्हाला बाजीप्रभू समजले असते तर राज्याने तुम्हाला नाकारले नसते’ अशी बोचरी टीका उद्धव यांनी यावेळी केली. परभणीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी 370 हटवल्याचा उल्लेख केला. महाराष्ट्राने मोदींना भरपूर प्रेम दिले आणि त्याचा मला अभिमान आहे. आमच्या जाहीरनाम्यात असलेलं 370 मोदींनी हटवत शब्द पाळल्याचे यावेळी सांगितले .

काँग्रेसवर टीका करतांना उद्धव म्हणाले ,यावेळी टीका कुणावर करायची समजत नाही. कारण कॉंग्रेसला कोणी चेहरा नाही. अशोक चव्हाण एका कोपऱ्यात नांदेडला बोंबलत बसलेत अशी शेलक्या शब्दांतील टीका यावेळी पहायला मिळाली. शरद पवारांबद्दल बोलतांना उद्धव म्हणाले, पवारांना आरसा पाहिला कि भ्रष्टाचार दिसतो. ते म्हणतात की हे सरकार पडल्याशिवाय मी शांत बसणार नाही, मग २०१४ साली न मागता भाजपला पाठिंबा का दिला हेसुद्धा पवारांनी सांगावं असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.