हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची मोठी बहीण हमिदा हिचे नुकतेच निधन झालेले आहे. ती कोरोनाव्हायरसने ग्रस्त होती. ठाण्यातील मुंब्रा येथे तिच्यावर उपचार सुरू होते. १ महिन्याच्या आतच छोटा शकीलच्या दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच त्याची धाकटी बहीण फहमिदा शेख हिचे निधन झाले होते.
तरुण बहिणीचा मृत्यू झाला
छोटा शकील याच्या लहान बहिणीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. तिची कोरोना टेस्टदेखील झाली होती. फहमिदा मुंबईतल्या मीरा रोड येथे आपल्या कुटूंबियांसोबत राहत होती. तीचे पती आरिफ शेख व्यवसायाने प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात. बहिणीच्या निधनानंतर छोटा शकीलने त्याचा मेहुणे आरिफ आणि कुटुंबीयांशी फोनवर विचारपूस केली.
छोटा शकील कोण आहे?
छोटा शकील ६० च्या दशकाच्या मध्यात मुंबईत एक संशयित ट्रॅव्हल एजन्सी चालवत असे. १९८० च्या दशकात तो आणि दाऊद एकत्र येऊन एक माफिया म्हणून उदयास आले. तो दाऊदच्या अगदी जवळचा समजला जातो. अनेक तपास यंत्रणांचे असे म्हणणे आहे की, तो दाऊदची कंपनी डी कंपनी चालवत असे.
१९८८ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक झाल्यानंतर छोटा शकीलने सुमारे चार महिने तुरूंगात घालविले. जामीन मिळताच तो दाऊदसह दुबई येथे पळून गेला. नंतर मार्च १९९३ मध्ये या दोघांनी भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची मुंबई सीरियल ब्लास्टची योजना आखली आणि ती अंमलात आणली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.