माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन 12 वाजवीन; राणेंचा पवारांना थेट इशारा

0
611
Narayan Rane Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहिती नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो. तर, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात. अजित पवार माझ्या नादाला लागू नका नाही तर पुण्यात येऊन बारा वाजवीन,” असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील चिंचवडमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. पवारांच्या या टीकेला मंत्री राणे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिले. यावेळी राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे राहिलं काय? कुठलंही अस्तित्व नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणावं.

अजित पवार काय म्हणाले?

पुण्यातील चिंचवडमध्ये सभेवेळी अजित पवार यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं असं म्हणाले होते. वांद्रे पोटनिवडणुकीत 2015 मध्ये काँग्रेस उमेदवार नारायण राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता. त्यामुळे अजित पवार बाईनं पाडलं म्हणत राणेंना डिवचले होते.