Monday, February 6, 2023

समीर वानखेडे प्रामाणिक अधिकारी, मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केल जातंय – रामदास आठवले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांकडून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्वाचे विधान केले आहे. समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांचे चुकत असेल तर नक्की त्यांना शिक्षा करावी. मात्र, ते केवळ मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केले जात असल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. सध्या ते शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अटकेवरून पुन्हा चर्चेत आले आहेत.

- Advertisement -

समीर वानखेडे या अधिकाऱ्याने जर खरच काही चुकीचे केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते. मात्र, तसे केले नाही. या उलट वानखेडे हे एक मागासवर्गीय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे, असे आठवले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.