हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनियापोलीस येथील कायदा अंमलबजावणी एजन्सीनी निषेध आंदोलनाच्या वेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अनेक वाहनांचे टायर पंक्चर केल्याचे सांगितले आहे. जॉर्ज फ्लाईडच्या मृत्यूनंतर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन केले होते. इथला जनसमुदाय संतप्त झाला होता. या अशांततेच्या वेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी असे कृत्य केले असलेल्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
सार्वजनिक सुरक्षा विभाग मिनेसोटाचे ब्रूस गार्डन म्हणाले, पोलीस या आंदोलनकर्त्यांना थांबविण्याचा तसेच त्यांनी वाहने धोकादायक पद्धतीने चालवू नयेत यासाठी प्रयत्न करत होते. वाहने वेगाने चालविणे रोखण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असल्याचे ब्रुसनी सांगितले. तसेच आंदोलनात आणलेल्या दगड, काँक्रीट, लाठी यासारख्या हिंसक साधनांवरही पोलिसांनी कोणतीच हानी होऊ नये यासाठी हल्ला चढविला असे त्यांनी सांगितले.
अनोखा काऊंटीमधील प्रतिनिधींनीही फ्लाईडच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनात पोलिसांनी टायर बदलल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारच्या नेतृत्वाखालील मल्टीएजेन्सी कमांड सेंटरच्या आदेशांचे पालन करण्याचे काम हे प्रतिनिधी होते, जे निषेधाच्या वेळी कायदा अंमलबजावणीचा समन्वय साधत होते, त्यांनी सांगितले की, स्टार ट्रिब्यूनच्या रिपोर्टरच्या कारवरील चारही टायर्स निषेध व अशांततेच्या पार्श्वभूमीवर एका कार पार्किंगमध्ये पंक्चर करण्यात आले होते. जॉर्ज फ्लाईड या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीची गौरवर्णीय पोलिसाने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर हे आंदोलन उसळले होते.