हाथरसनंतर आता उन्नाव; शेतात आढळले ओढणीने हातपाय बांधलेल्या २ मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्नाव । हाथरसमधील घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होत. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात दोन दलित मुलींच्या मृत्यू प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेकांना हादरवून सोडलंय. उन्नाव जिल्ह्यामध्ये एका शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. यातील दोन मुलींचा मृत्यू झाला होता तर तिसरी जिवंत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिच्यावर कानपूरच्या रिजन्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच प्राथमिक तपासादरम्यान विषबाधेने मृत्यू झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतात संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.

पीडित मुलीच्या गावात आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुली शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या आहेत. सध्या या प्रकरणात अनेकांची अधिक चौकशी केली जात असून वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे. तर मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघी जणी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असल्याचं म्हटलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

Leave a Comment