स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका महिला अपराधीला मिळणार फाशी ! जाणून घ्या काय आहे गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका महिला अपराध्याला फाशीची शिक्षा होणार आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये सन 2008 मध्ये एकाच परिवारातील 7 लोकांची कुर्‍हाडीने हल्ला करून अमानुष हत्या झाली होती. ही हत्या त्याच कुटुंबातील शबनम हिने केली होती. शबनमला आता लवकरच फाशी होणार आहे. आपले प्रेम संबंध वाचवण्यासाठी शबनमने आपल्याच कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून केला होता. यामध्ये तिचा दहा महिन्याचा भाचा आणि गरोदर वहिनीचाही समावेश होता.

2008 मध्ये अमरोहा येथे शबनमने तिच्या कुटुंबातील सात सदस्यांचा निर्घुण खून केला होता. यामध्ये तिचे शिक्षक वडील शौकत आली, आई अस्मि, अनिस व रशिद हे भाऊ आणि वहिनी अंजुम सोबतच दहा महिन्यांचा भाचा यांचा मृत्यु पावलेल्या सदस्यांमध्ये समावेश होता. या हत्याकांडानंतर शबनमला लगेच जेलमध्ये पाठवण्यात आले. जेलमध्ये पाठवल्याच्या एका महिन्यानंतर शबनमने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव ‘ताज’ असे ठेवण्यात आले होते. ताज सध्या शबनमच्या ओळखीच्या कुटुंबाकडे असून, त्याची जबाबदारी त्या कुटुंबाने घेतली आहे.

सर्व कुटुंबाच्या हत्येनंतर शबनमच्या कुटुंबाच्या संपत्तीला शबनम हीच एकमेव वारस आहे. शबनमच्या फाशीनंतर ही संपत्ती तिच्या मुलाला मिळू शकते. कुटुंबाची संपत्ती दान करण्याचा विचार शबनम करत असल्याचेही समजते. तिच्या ओळखीच्या कुटुंबाकडे शबनमच्या मुलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुलाला सुपूर्त करताना शबनमने दोन अटी ठेवल्या होत्या. पहिली अट म्हणजे, तिच्या मूळगावी त्याला भविष्यात कधीच घेऊन जाण्यात येऊ नये आणि दुसरे म्हणजे त्याचे नाव बदलून त्याचे संगोपन करण्यात यावे. शबनमचे चुलता व चुलती गावी असून त्यांनी फासीनंतर तिचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे. दरम्यान शबनमचा मुलगा ताज याने राष्ट्रपतींकडे शबनमची फाशीची शिक्षा माफ होण्यासाठी माफी अर्ज दाखल केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment