व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बांधकाम विभागाचा अनानोंदी कारभार चव्हाट्यावर : अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दाैऱ्यात बांधकाम विभागाची लक्तरे चांगलीच वेशीवर टांगली गेली. कराडनंतर कोयनानगर येथेही शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या कामामुळे बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. कोयनानगर येथील नविन विश्रामगृहाचे उद्घाटन केल्यानंतर चक्क अजित पवार यांनीच चाैकशी करण्याचे सूतोवाच दिले. तसेच अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली.

कोयनानगर येथे नव्याने शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन करण्यात आले. तत्पूर्वी अजित पवार हे कराड येथे मुक्कामास होते. कराड येथे एक नविन शासकीय विश्रामगृह बांधण्यात आले असून अद्याप ते बंद अवस्थेत आहे. तर नवीन इमारतीला उद्घाटनचा मुहूर्त मिळत नसताना अजित पवार यांनीच नव्या इमारतीला चिरा पडल्या असल्याचे निदर्शनास आणले. त्याच बरोबर कराड येथील जुन्या इमारतीत अनेक त्रुटी असून अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. बांधकाम अधिकाऱ्यांना न दिसणारी अस्वच्छता अजित पवार यांनी दाखवताच अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली.

लाईटचे अनावश्यक पाॅंईट जादा

कोयना नगर येथे नव्याने होत असलेल्या कोयना विश्रामगृहचे उदघाटन व कोयना धरणाच्या पाण्यातील पर्यटन प्रकल्पाची माहिती अजित पवारांनी घेतली. आजित पवारांनी गळती, अनावश्यक असलेले लाईटचे पॉइंट, कमोड, वॉश बेसिनची जागा अशा कामातील तृटींची लिस्ट काढून बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी अधिकाऱ्यांची भांबेरी उडली. विश्रामगृहात लाईटचे पाॅंईट जादा असल्याने अजित पवार यांनी त्याबाबत विचारताच, पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, पाॅंईटवर बिल असते. त्यामुळे जादा असतील.