हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. डिजिटल पेमेंटसाठी युपीआय द्वारे आपल्याला घरबसल्या अगदी सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. बहुतेक लोकांकडून युपीआय पेमेंट करण्यासाठी GooglePay,Paytm, PhonePe, Bhim, सारखे युपीआय Apps वापरले जातात. मात्र यासाठी आपल्याकडे इंटरनेट असावे लागेल. मात्र जर आपल्याला फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसेल किंवा फीचर फोनद्वारे पैसे ट्रान्सफर करता आले तर… होय, आता असे करणे शक्य आहे. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
इंटरनेटशिवाय अशा प्रकारे काम करेल UPI 123Pay
अलीकडेच RBI कडून युपीआय , UPI 123Pay चे नवीन व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. भारतातील सुमारे 40 कोटी फीचर फोन युझर्सना डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये आणणे हा त्यामागील उद्देश आहे. UPI 123Pay द्वारे, ज्या ग्राहकांकडेकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन नाही त्यांना देखील युपीआय ट्रान्सझॅक्शन करता येतील. RBI नुसार फीचर फोन युझर्सना 4 तांत्रिक पर्यायांच्या मदतीने ट्रान्सझॅक्शन करता येतील.
1. इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR)- आपल्या फोनवर IVR नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा आणि दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा आणि युपीआय पिन वापरून पेमेंट पूर्ण करा.
2. ऍप बेस्ड पेमेंट
3. मिस्ड कॉल
4. प्रॉक्सिमिटी साउंड-बेस्ड पेमेंट
USSD द्वारे देखील इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करता येईल
UPI 123Pay व्यतिरिक्त, इंटरनेटशिवाय पेमेंट करण्याचा आणखी एक मार्ग आहे. त्यासाठी USSD सर्व्हिस वापरावी लागेल. यासाठी, सर्वांत आधी आपल्या GSM स्मार्टफोनवर ‘*99#’ डायल करावे लागेल आणि सूचनांचे पालन करावे लागेल. मात्र, हे लक्षात घ्या कि, सर्व मोबाइल सर्व्हिस ऑपरेटर या सर्व्हिसला सपोर्ट देत नाहीत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi-123pay/product-overview
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा