हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, RBI कडून आता युनिफाइड पेमेंट इंटरफेसचे पुनरावलोकन केले जात आहे. ज्यानंतर UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र अर्थ मंत्रालयाकडून नुकतेच याबाबतीत एक दिलासा देणारी माहिती दिली गेली आहे. याबाबत मंत्रालयाने सांगितले की,” युपीआय पेमेंट सर्व्हिससाठी सरकारचा कोणतेही शुल्क आकारण्याचा विचार नाही.”
UPI is a digital public good with immense convenience for the public & productivity gains for the economy. There is no consideration in Govt to levy any charges for UPI services. The concerns of the service providers for cost recovery have to be met through other means. (1/2)
— Ministry of Finance (@FinMinIndia) August 21, 2022
अर्थ मंत्रालयाने एक ट्विट करत म्हंटले की, “युपीआय हा लोकांसाठी अत्यंत सोयीस्कर डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याचे अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान आहे. ज्यामुळे युपीआय पेमेंट सर्व्हिससाठी कोणतेही शुल्क लादण्याचा विचार केला जाणार नाही. तसेच सर्व्हिस प्रोव्हायडरच्या खर्चाच्या वसुलीसाठी इतर काही पर्यायांचा विचार केला जाईल.”
UPI म्हणजे काय ???
युपीआय ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. ज्याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. विशेष म्हणजे युपीआय द्वारे आपल्याला रात्री किंवा दिवसा कधीही पैसे ट्रान्सफर करता येतात.
UPI सिस्टीम कसे काम करते ???
युपीआय सुविधा वापरण्यास अगदी सोपी आहे. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल पे, पेटीएम, फोनपे, भीम इत्यादी कोणतेही युपीआय App डाउनलोड करावे लागतील. आपले बँक खाते या Apps शी लिंक करून ही सिस्टीम वापरता येईल. युपीआय द्वारे, आपल्याला एक बँक खाते एकापेक्षा जास्त युपीआय Apps शी लिंक करता येईल. त्याच वेळी, एकाच App द्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!
Stock Market : ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक !!!