हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल काळात ऑनलाइन पेमेंट मोडचा वापर वाढला आहे. अशातच Google Pay, Phone Pay आणि Paytm सारखे प्लॅटफॉर्म ही उपलब्ध झाले आहेत. अनेक लोकं लहान- मोठी कोणतीही खरेदी केल्यानंतर UPI पेमेंट प्लॅटफॉर्म वापरत आहेत. मात्र 1 एप्रिलपासून ग्राहकांना खिसा सैल करावा लागेल. कारण आता डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला मर्चंट ट्रान्सझॅक्शनवर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू करण्यास सांगितले गेले आहे. या परिपत्रकातील माहितीनुसार, 2,000 रुपयांपेक्षा जास्त UPI ट्रान्सझॅक्शनवर 1.1 टक्के शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क मर्चंट ट्रान्सझॅक्शनसाठी द्यावे लागेल.
‘बिझनेस स्टँडर्ड’ मधील रिपोर्ट्सनुसार, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) च्या UPI पेमेंटवर 1.1% इंटरचेंज चार्ज आकारले जाईल. हे जाणून घ्या की, वॉलेट किंवा कार्डद्वारे पीपीआयमध्ये ट्रान्सझॅक्शन होते. सामान्यत: इंटरचेंज चार्ज हे कार्ड पेमेंटशी संबंधित असतात आणि ट्रान्सझॅक्शन स्वीकारण्यासाठी आणि खर्च कव्हर करण्यासाठी आकारले जातात. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की,” 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्याआधी त्याची समीक्षा देखील केली जाईल.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर