हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या सणासुदीच्या काळात Maruti Suzuki कडून आपल्या कारवर 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीकडून Swift, DZire, WagonR आणि S-Presso सारख्या मॉडेल्सच्या खरेदीवर ही ऑफर आणि एक्सचेंज बोनस देण्यात येणार आहे.
Celerio वर 49,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Celerio च्या मॅन्युअल वेरिएंटवर 49,000 रुपयांची सूट मिळेल तर AMT व्हेरिएंटवर 34,000 रुपयांची सूट मिळेल.
Maruti Suzuki च्या S-Presso मायक्रो SUV च्या मॅन्युअल व्हेरिएंटवर देखील 49,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर AMT व्हेरिएंटवर 34,000 ची रुपयांची सूट मिळेल.
Maruti Suzuki डिझायर मॉडेल देखील 40,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन मिळेल. तसेच ती 90 एचपी पॉवर देत असल्याचा दावा कंपनीकडून केला जातो आहे. याबरोबरच याचे इंजिन पाच-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
त्याच बरोबर Maruti Suzuki अल्टोवर 29,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यावर ग्राहकांना कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस देखील मिळेल. याशिवाय या छोट्या कारवर कॉर्पोरेट बोनसही मिळेल.
तसेच Maruti Suzuki स्विफ्टवर 45,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. AMT व्हेरिएंटवर 45,000 रुपयांची सूट मिळेल तर मॅन्युअल व्हेरिएंटवर 25,000 रुपयांची सूट मिळेल. मारुती सुझुकी स्विफ्ट ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.
Maruti Suzuki वॅगनआरला मॅन्युअल वेरिएंटवर 39,000 रुपये आणि AMT व्हेरिएंटवर 34,000 रुपयांची सूट मिळेल . हा लोकप्रिय टॉलबॉय हॅचबॅक पेट्रोल इंजिनच्या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. यामध्ये 1.0-लिटर आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.marutisuzuki.com/
हे पण वाचा :
FD Rates : अल्पावधीत FD वर 7.5% पर्यंत व्याज देणाऱ्या टॉप 10 बँकांची लिस्ट पहा
SBI MODS : खुशखबर !!! आता कोणत्याही दंडाशिवाय SBI च्या ‘या’ FD खात्यातून काढता येतील पैसे
रिटायरमेंटनंतरच्या Pension साठी NPS की PPF मधील कोणता पर्याय योग्य ठरेल ते जाणून घ्या
गेल्या काही वर्षांत ‘या’ 2 Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश !!!
HDFC Bank कडून ग्राहकांना धक्का !!! होम लोन वरील व्याजदरात केली वाढ