हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतातील भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलिस अधिकाऱ्याच्या वेषात आलेल्या एका बंदूकधार्याने गोळीबार केला आणि घरे नष्ट केली यामध्ये १६ लोक ठार झाले.रविवारी झालेला हा हल्ला या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा प्राणघातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, संशयित हल्लेखोरही ठार झाला आहे.मृतांमध्ये एक पोलिस अधिकारीही आहे.
पोलिसांनी सांगितले की घटनास्थळ पोर्टॅपिकमध्ये छोट्या आणि ग्रामीण शहरातील एका घराच्या आत व बाहेर अनेक मृतदेह सापडले आहेत.इतर ठिकाणीही मृतदेह आढळले आहेत. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की हल्लेखोराने आधी त्याचे लक्ष्य असलेल्या लोकांना टार्गेट केले,परंतु नंतर त्याने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. रात्रीच्या वेळी पोलिसांनी शहरातील रहिवाशांना घर बंद ठेवून आणि भूमिगत तळघरामध्ये राहण्याचा सल्ला देण्यास सुरवात केली. परिसरातील अनेक घरांनाही यावेळी आग लावण्यात आली.
पोलिसांना बंदूकधाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून तो ५१ वर्षांचा गॅब्रिएल वॉर्टमन असून तो कधीकधी पोर्टॅपिकमध्ये राहत होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याने पोलिसांचा गणवेश घातला होता आणि त्यांची कार रॉयल कॅनेडियन माऊंट्ड पोलिस (आरसीएमपी) च्या क्रूझरसारखी दिसत होती. यापूर्वी त्यांनी एनफिल्ड भागातील गॅस स्टेशन वरून वॉर्टमनला अटक केल्याची घोषणा केली होती पण नंतर तो मारला गेल्याचे सांगितले.
नोव्हा स्कोस्टियाचे प्रमुख स्टीफन मॅकनील म्हणाले की, आमच्या प्रांताच्या इतिहासातील हिंसाचाराची ही सर्वात क्रूर घटना आहे. आरसीएमपीचे प्रवक्ते डॅनियल ब्रायन यांनी संशयिताव्यतिरिक्त १६ जण ठार झाल्याची पुष्टी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.