बीजिंग । चीनने रविवारी म्हटले आहे की, उइघूर समुदाय आणि इतर मुस्लिम वांशिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या गैरवर्तनात त्यांच्या कथित भूमिकेसाठी चीनी कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या अमेरिकेच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे की,” अमेरिकेचे हे पाऊल चीनी उद्योजकांवर अन्यायकारक दडपशाही आहे आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन आहे.”
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की,” चीन “चीनी कंपन्यांच्या कायदेशीर हक्क आणि हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल”.” झिनजियांगच्या पश्चिम भागात उइघूर समुदायाला मनमानी पद्धतीने अटक करणे आणि त्यांना सक्तीने श्रम करायला लावल्याच्या आरोपाच चीनने खंडनकेले आहे. त्याचबरोबर त्याच्या कंपन्या आणि अधिकाऱ्यांवरील निर्बंधाला उत्तर देताना व्हिसा आणि आर्थिक संबंधांवर निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे.
अमेरिकन वाणिज्य विभागाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान कंपन्या तसेच इतर व्यावसायिक संस्थांनी चीनी सरकारच्या शिनजियांगमधील मुस्लिम अल्पसंख्याकांविरूद्ध दडपशाही, सामूहिक अटक आणि उच्च तंत्रज्ञान पाळत ठेवण्याची मोहीम सक्षम करण्यास मदत केली आहे. या निर्बंधांनुसार अमेरिकन या चिनी कंपन्यांना उपकरणे किंवा इतर वस्तू विकू शकत नाहीत.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group