अमेरिकेत लोकांकडे खाण्यासाठी नाहीत पैसे,फूड बँकेच्या बाहेर लागतायत लांबलचक रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत, कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या रोगाने ग्रस्त असलेली कुटुंबे बहुधा फूड बँकेत जात असतात. अशी दृश्ये आता सामान्य झाली आहेत जिथे लांबलचक गाड्यांच्या रांगा अनेक तास दानाच्या प्रतीक्षेत थांबल्या आहेत. लॉकडाऊनमुळे रातोरात व्यवसाय बंद झाल्यामुळे २२ दशलक्ष लोक बेरोजगार झाले आहेत आणि खाणेपिण्यासाठी ते देणगीदारांवर अवलंबून आहेत.मंगळवारी पेनसिल्व्हेनियामधील ग्रेटर पिट्सबर्ग कम्युनिटी फूड बँकेच्या वितरण केंद्रावर जवळपास १ हजार गाड्या रांगा लागल्या होत्या.

पॅकेटची मागणी ४०%ने वाढली
मार्चमध्ये ग्रेटर पिट्सबर्ग कम्युनिटी या फूड बँकेकडून देण्यात येणाऱ्या अन्नाच्या पॅकेटची मागणी सुमारे ४०टक्क्यांनी वाढली आहे.संस्थेचे उपाध्यक्ष ब्रायन गुलिश म्हणाले, “अनेक लोकं पहिल्यांदाच आमच्या सेवेचा उपयोग करीत आहेत. ते यापूर्वी फूड बँकेत कधीचआलेले नव्हते. ”ते पुढे म्हणाले की त्यामुळे नैऋत्य पेनसिल्व्हेनिया येथे ३५० वितरण केंद्रे आहेत हे त्यांना ठाऊक नाही आहे. ते म्हणाले, “म्हणूनच या रांगा इतक्या लांबपर्यंत लागलेल्या आहेत कारण त्यांना माहित नाही की आमचे नेटवर्क इतके मोठे आहे.”

Food Banks Are Overrun, as Coronavirus Surges Demand - The New ...

संपूर्ण अमेरिकेत लोक खाण्यासाठी गर्दी करतात
न्यू ऑर्लीयन्स पासून डेट्रॉईट पर्यंत, लोक संपूर्ण अमेरिकेत फूड बँकमध्ये पॉप अप करत आहेत. बोस्टन उपनगरातील चेल्सी येथील अन्न वितरण केंद्रात, एलाना नावाच्या एका महिलेने सांगितले की, “आम्हाला काम करून काही महिने झालेत. काल मला एक महिला भेटली जी १५ दिवसांच्या नवजात मुलासह आलेली होती.तिचा नवरा काही काम करत नाही,तिला आणखी दोन मुले आहेत.त्याच्या घरात कोणतीही खाण्याची वस्तू नाही आहे. ”फूड बँक अधिकारी सर्वत्र म्हणतात की या साथीच्या काळात त्यांच्याकडे अन्नाची मागणी अचानक वाढली.

These Photos Show the Staggering Food Bank Lines Across America ...
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment