हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना लस बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने ऐनवेळी नकार दिला होता. परंतु आता सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर अखेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन याना नमतं घ्यावं लागलं. अखेर अमेरिकेकडून भारताला सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन देण्यात आले असून लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी अमेरिकेने दर्शविली आहे.
भारतीय एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे समकक्ष जेक सुलिवन यांच्यामध्ये रविवारी फोनवर चर्चा झाली. यानंतर अमेरिका आपल्या आडमुठेपणाच्या धोरणावरून मागे हटली आहे. तसेच भारताला सहकार्य करण्यावर चर्चा करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी ट्विट केलं असून, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं आहे.
Just as India sent assistance to the United States as our hospitals were strained early in the pandemic, we are determined to help India in its time of need. https://t.co/SzWRj0eP3y
— President Biden (@POTUS) April 25, 2021
लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.