लस घेतली एक अन् पैसै दहा लसींचे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहीती

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल ः जयंत पाटील

सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनी कोरोनाचा पहिला डोस पैसे देवून घेतला. परंतु मुलांगा प्रतिक यांने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी एक डोस घेतला मात्र, दहा लसींचे पैसे दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्याकडे जयंत पाटील यांनी लस घेतल्यानंतर धनादेश सुपुर्द केला. याबाबतची माहिती सोशल मीडियातून त्यांनी शेअर केली आहे.

जयंतरावांनी म्हटले आहे की, आज सांगली येथे लसीचा पहिला डोस घेतला. प्रतीक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या #Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून माझ्यासह दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिला. या तरुणांनी सुरू केलेला उपक्रम फार स्तुत्य आहे.

लस अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे आणि परिस्थिती आटोक्यात येत आहे. मला विश्वास आहे की कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.

You might also like