Valentine’s Day Offers : व्हॅलेंटाईन डे ऑफर अंतर्गत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळेल जबरदस्त डिस्काउंट,

Valentine's Day Offers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Valentine’s Day Offers : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. जर आपण यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला आपल्या जोडीदाराला काहीतरी छान भेट देणार असाल तर आपण इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार करू शकता. यामध्ये पेट्रोलसाठी कोणताही खर्च होणार नाही ज्यामुळे ही एक चांगली भेट ठरू शकेल. अशातच आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक कंपनी जबरदस्त ऑफर्स देखील देत आहे.

Okinawa Crosses 1 Lakh Electric Scooter Sales In India

व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत सोमवारी Okinawa Autotech कडून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या काही मॉडेल्सवर खास ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या अंतर्गत या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर 12,500 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. याबाबत कंपनीने सांगितले की,” ही ऑफर फक्त 15 फेब्रुवारीपर्यंतच व्हॅलिड असेल.” Valentine’s Day Offers

भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर स्पेसमधील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक Okinawa देखील आहे. या कंपनीकडून PraisePro, Okhi-90 आणि iPraise+ सारख्या मॉडेल्सची विक्री केली जाते. 2015 मध्ये लॉन्च झालेल्या या कंपनीचे देशभरात 542 टचपॉइंट्स आहेत. यासोबतच ओकिनावाचे भारतातील 291 शहरांमध्ये 403 ओकिनावा स्कूटर डीलर आहेत. Valentine’s Day Offers

Festive season brings special offers on Okinawa e-scooters

कंपनीने जाहीर केले की, हा खास व्हॅलेंटाईन डे डिस्काउंट ऑफर त्यांच्या iPraise+, PraisePro आणि Ridge+ सारख्या हाय-स्पीड मॉडेल्सवर आणि R30 आणि Lite सारख्या कमी-स्पीड मॉडेल्सवर व्हॅलिड असेल.

ओकिनावाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत.61,998 रुपयांपासून सुरू होते. ओकिनावा या कंपनीकडून एकूण 8 स्कूटरची विक्री केली जाते, ज्यामध्ये क्रूझरचा देखील समावेश आहे. सर्वात महाग ओकिनावा स्कूटर Okinawa Okhi90 ही आहे ज्याची किंमत 1.86 लाख रुपये आहे. लाइन-अपमधील सर्वात लोकप्रिय नावांमध्ये PraisePro, iPraise+, R30, Oakhi90, Dual 100, Ridge आणि Lite यांचा समावेश आहे. Valentine’s Day Offers

Okinawa Electric Scooters | Specifications | Features | Price - EV Duniya

Oakhi90 इलेक्ट्रिक स्कूटर 160 किमीच्या रेंजसह येते. याचा टॉप स्पीड 55-60 किमी प्रतितास आहे आणि स्पोर्ट मोडमध्ये ते 85-90 किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकते. स्कूटर फक्त 10 सेकंदात 90 किमी प्रतितासचा वेग गाठू शकते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://okinawascooters.com/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ