मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या राज्कारात चांगलीच छाप उमठवणारा पक्ष म्हणून वंचित आघाडीचा उल्लेख केला जाऊ लागला आहे. तर काँग्रेस आघाडीची चांगलीच डोकेदुखी वाढवणारा पक्ष म्हणून देखील वंचितचा उल्लेख केला वाजतो आहे. त्यामुळे येती विधानसभा निवडणूक देखील वंचित स्वबळावरच लढणार आहे असे चित्र सध्या त्यांच्या तयारी वरून दिसू लागले आहे. कारण वंचित येत्या ३० तारखेला आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यास काँग्रेसला सोबत आघाडी करण्याच्या शक्यता एकाअर्थी मावळणार आहेत. त्यामुळे वंचितने यादी जाहीर करण्याआधी काँग्रेसने वंचित सोबत बोलणी करून घ्यावी असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. त्यामुळे वंचित आणि काँग्रेस यांचा घरोबा होणार की लोकसभा निवडणुकी प्रमाणेच त्यांच्यात फाटणार हे बघण्यासारखे राहणार आहे.
दरम्यान ३० जुलै रोजी जाहीर होणारी यादी हि विदर्भातील असणार आहे. कारण वंचितने फक्त विदर्भाच्या इच्छुक उमेदवारांच्या फक्त मुलाखती घेतल्या आहेत. १३ ते १६ जुलै या कालावधीत इच्छुक उमेदवारांच्या नागपूर येथे स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतरच या इच्छुकांच्यावर चर्चा करून त्यांचे नाव जाहीर केले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वंचितने काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या चिंतेत वाढ केली आहे.