जालन्यात प्रकाश आंबेडकरांच्या अटकेचे पडसाद, ‘वंचितसेना’ रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी । आरे येथील जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज जालन्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनाच्या वेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परीसर दणाणून सोडला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अटकेचा निषेध केला.

दरम्यान, दिवसेंदिवस पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत असताना नागरिकांमधील पर्यावरणीय संवेदनशीलताही वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईचं फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरही नागरिकांनी आपला प्रखर विरोध तीव्र केला आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने देखील यात उडी घेतली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आरेमध्ये येऊन याला विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतलं होते. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली. बारामतीतील गुनवडी चौकात याचा निषेध म्हणून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. तसेच बसवर ‘बाळासाहेबांना अटक करणाऱ्या ‘बीजेपी’ सरकारचा निषेध’ असं फलक लावून दगडफेक झाली. तसेच आज जालना मध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले.

इतर काही बातम्या-