Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं संभाव्य वेळापत्रक तयार; 7 तासांत होणार प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी पाहता सरकार कडून देशातील कानाकोपऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यामध्ये 9 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. आता लवकरच महाराष्ट्रात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. याबाबतचे संभाव्य वेळापत्रक सुद्धा तयार करण्यात आल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिले आहेत.

कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे. या संदर्भातल्या बैठका सुरू आहेत. या वंदे भारत एक्सप्रेसचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले. या एक्सप्रेसचा वेग ताशी १६० कि.मी. असेल. मिरज इथं ट्रॅकचं थोडं काम आहे ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. परंतु, येत्या दोन महिन्यात ही सेवा सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे धनंजय महाडिक यांनी म्हंटल.

कस असेल वेळापत्रक? Vande Bharat Express

नवीन सुरु होणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरहून पहाटे ५.५० ला निघेल. त्यानंतर मिरज येथे ६.१८, सांगलीला ६.३५ ला, साताऱ्यात ७.५५ , पुणे १०.०३, त्यानंतर कल्याण १२.०५, ठाणे १२.२५ आणि मुंबईतील छ. शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी १२.५६ ला पोचेल. म्हणजेच कोल्हापूर ते मुंबई हे अंतर तुम्ही फक्त ७ तासांत पार करू शकणार आहात. वंदे भारत एक्सप्रेस मुंबई- कोल्हापूर मार्गांवर कधी पासून सुरु होईल या बाबतीत अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी धनंजय महाडिक यांनी केलेले सुतोवाच या मार्गांवर वंदे भारत ह्या मार्गांवर लवकरच सुरु होईल या बद्दल खात्री देते.

महालक्ष्मी एक्सप्रेसचा ताण होणार कमी

सह्याद्री एक्सप्रेस बंद झाल्यापासून मुंबईहुन कोल्हापूरला जाण्यासाठी सर्व ताण मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसवर आला होता. तो ताण आता वंदे भारत एक्सप्रेस मुळे कमी होण्याची शक्यता आहे. नवी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मुंबईकरांसाठी देवी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठीचा प्रवास अधिक सुखकर करण्यात मदत करेल.