पुणे । मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे हे मागील काही दिवसांपासून माध्यमांत चर्चेत होते. मशिद्दीबाहेरील भोंग्यांबाबत राज यांच्या भूमिकेवरून मोरे यांनी आपलं वेगळं मत मांडलं होत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोरे यांची पुणे शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. Vasant More
यांनतर अनेक चर्चा रंगल्या. वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार, शिवसेनेत जाणार अशा तर्क वितर्कांना पेव फुटला. मात्र वसंत मोरे यांनी आपली ठोस भूमिका मांडली न्हवती. हकालपट्टी हा शब्द आपल्याला खुप लागला असल्याचं मोरे माध्यमांसमोर म्हणाले होते.
आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान "माझा वसंत" हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले अरे इथे तर मी काहीच हरवले नाही. उगाचच भीतीने पोटात गोळा आला होता. म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा! pic.twitter.com/qiExvaXr0p
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 11, 2022
आज वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्याकरता मुंबईला गेले होते. त्यानंतर राज यांच्या भेटीबाबत मोरे यांनी एक ट्विट केले आहे. राज ठाकरे यांच्या पाय पडतानाचा फोटो ट्विट करून मोरे यांनी भावून होत आपलं मत व्यक्त केलं आहे. Vasant More
आयुष्यात खूप पदं मिळाली कामाच्या व निष्ठेच्या जिवावर. पद आज आहे उद्या नाही ओ. पण माझं जे स्थान “माझा वसंत” हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, तिथे गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले अरे इथे तर मी काहीच हरवले नाही. उगाचच भीतीने पोटात गोळा आला होता. म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा अशा आशयाचे ट्विट मोरे यांनी केले आहे.