१० रुपयांसाठी भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजी विक्रेत्याने ग्राहकांसोबत झालेल्या वादातून खून केल्याची घटना दादरमध्ये घडली आहे. अवघ्या दहा रुपयांसाठी भाजी विक्रेत्याने ग्राहकाला भोकसल्याचा धक्कादायक प्रकार दादर स्टेशन नजीक घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना काल सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

सोनीलाल हा दादर स्टेशनच्या जवळ भाजी विकण्याचा व्यवसाय करतो. गरम डोक्याचा आसणारा सोनीलाल हा नेहमीच ग्राहकांसोबत भांडत असतो. त्याच्याकडे सोमवारी रात्री मोहम्मद हनीफ हा भाजी घेण्यासाठी आला तेव्हा सोनीलाल याने त्याच्या सोबत किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. सोनीलालचा रागाचा पारा वाढल्याने त्याने मोहम्मद हनीफ ग्राहकाचा खून केला.

 

घटनास्थळा वरील लोकांनी पोलिसांना कळवले आणि जखमी मोहम्मद हनीफला केईएम रुग्णालयात हालवले. मात्र उपचारा दरम्यान मोहम्मद हनीफचा मृत्यू झाला. तर सोनीलाल घटनास्थळावरुन खून करून फरार झाला होता. त्याला पोलिसांनी काही तासातच शोधून काढले आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment