मुंबई प्रतिनिधी |सांगली जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. भाजपचे संख्याबळ बघता भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी ७ जूनला मतदान होत आहे.
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा
पृथ्वीराज देशमुख हे दिवंगत संपतराव देशमुख यांचे पुतणे आहेत. १९९५ साली पार पडलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संपतराव देशमुख यांनी पतंगराव कदम यांना पराभूत केले. या नंतर अवघ्या दोन वर्षांत संपतराव देशमुखांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी पृथ्वीराज देशमुख यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी देखील आपल्या चुलत्या प्रमाणे पतंगराव कदम यांचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज देशमुख यांना कधीच विधी मंडळात जाण्याची संधी मिळाली नाही.
मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान पृथ्वीराज देशमुख यांची निवड बिनविरोध देखील केली जाण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तसेच सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे त्यांचे बंधू आहेत.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय
स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील