विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा ‘द पॉवर’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

मुंबई । सध्या बॉलिवूडमधील अनेक बड्या चित्रपटांबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. बर्‍याच चित्रपटांचे शूटींगही चालू झाले आहे आणि बरेच चित्रपट रिलीजसाठी देखील तयार आहेत. दरम्यान, सुप्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांचा ‘द पॉवर’ हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये विद्युतच्या इतर चित्रपटांप्रमाणेच जबरदस्त अ‍ॅक्शनही पाहायला मिळत आहे. विद्युत आणि श्रुतीचा रोमान्स चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरूवातीलाच पाहायला मिळत आहे. यानंतर, रिव्हेंज स्टोरी दाखवली जाणार आहे. ट्रेलरमध्ये श्रुतीची स्टाईल देखील पाहण्यासारखी आहे.

‘द पॉवर’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी म्हणजेच आज, 12 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. विद्युत आणि श्रुतीच्या रोमँटिक दृश्यांसह हा 2 मिनिट 38 सेकंदाचा ट्रेलर सुरू होतो. त्यानंतर श्रुतीसोबत गंभीर अपघात होतो असे दाखविले गेले आहे. त्यानंतर श्रुतीच्या रिव्हेंजची स्टोरी सुरू होते, यामध्ये तिला बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग विद्युत जामवाल साथ देतो. यामध्ये जोरदार अ‍ॅक्शन सीन्स हि दाखवले गेले आहेत .

असा बोलले जात आहे की, विद्युत जामवाल आणि श्रुति हासन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटाची गोष्ट 90 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर बनवली गेली आहे. विद्युत आणि श्रुती व्यतिरिक्त अभिनेता प्रितीक बब्बरदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 14 जानेवारी रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे. हिंदीसह तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

https://t.co/259XkFNoIO?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like