Thursday, March 30, 2023

विजय शिवतारेंची प्रकृती ठणठणीत; घेतली आदित्य ठाकरेंची भेट

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या ICUमध्ये होते. याची माहिती विजय शिवतारे यांच्या मुलीने फेसबुक वर एक भावनिक पोस्ट लिहून दिली होती. यामध्ये तिने भावाकडून संपत्तीसाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपदेखील केला आहे. कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम केले जात असल्याचा आरोपदेखील शिवतारे यांच्या मुलीने केला होता.

- Advertisement -

शिवतारे यांच्या मुलीचे नाव ममता शिवदीप लांडे- शिवतारे असे आहे. ममता यांनी भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम करत असल्याचा आरोपदेखील तिने केला आहे. यामुळे विजय शिवतारे यांच्या घरातील वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ममता या आयपीएस शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. विजय शिवतारे यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते आता ठणठणीत बरे झाले आहेत.

विजय शिवतारे यांनी आज महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, युवासेनाप्रमुख व मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई या ठिकाणी भेट घेतली. या भेटीमध्ये पुंरदर हवेली विधानसभा मतदार संघातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या ठिकाणचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदित्यजींनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.