“उत्तर प्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट”; विजय वडेट्टीवार यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सविस्तर मुलाखत दिली. यावेळी उत्तर प्रदेशसह पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा मोदी यांनी केला. त्यांच्या दाव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशात लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. लाट असती तर उत्तर प्रदेशामध्ये असंतोष दिसला नसता. ही लाट असंतोषाची लाट आहे. बेरोजगारीची लाट आहे असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातीळ महत्वाचा प्रश्न असलेला ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाकडे अहवाल दिला आहे. निर्णय लवकर अपेक्षित आहे. आमच्याकडून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. आम्ही बनविलेल्या कायद्यानुसार निवडणूक घेतल्या जाऊ शकतात, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते मोदी ?

काल दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले के, निवडणुकीत सर्व राज्यात पाहतो आहे की भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेला आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारनं फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात, असे मोदी यांनी म्हंटले

Leave a Comment