धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळले जोडपे; गावकऱ्यांनी व्हिडिओ केला वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा : वृत्तसंस्था – पाटणा या ठिकाणी एक कपल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्याने गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला. एवढेच नाहीतर या कपलचा चोरून व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर वायरलदेखील केला. एवढेकरून देखील समाधान न झाल्याने त्यांनी या दोघांनाही बांधून मारहाणसुद्धा केली. यामधील अल्पवयीन मुलगी रडत हे सर्व सार्वजनिक न करण्याची विनंती करत राहिली. मात्र, लोकांनी काहीही दया न करता तिला लाथा आणि बुक्यांनी मारहाण केली.

हि घटना मध्यप्रदेशच्या समस्तीपूर जिल्ह्यातील कल्याणपूर ठाण्याच्या क्षेत्रातील गाव आंजना या ठिकाणची आहे. या ठिकाणी एका मक्याच्या शेतात गावकऱ्यांनी या कपलला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर गावकऱ्यांनी सर्वात आधी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि मग त्यांना पकडून ठेवले. यानंतर त्याठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली. गावातील युवकांनी या दोघांना बांबूच्या झाडाला बांधून त्यांना मारहाण केली. आंजना गावातील अल्पवयीन मुलगी आणि मिर्जापूरच्या एका अल्पवयीन मुलाचे काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम जडले. हा तरुण गावात महिलांचे मेकअपचे सामान विकण्यासाठी जात होता. याचदरम्यान त्यांची ओळख झाली. मात्र या दोघांची जात वेगळी असल्याने त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

याचदरम्यान हे कपल रविवारी गावातील एका मक्याच्या शेतात एकमेकांना भेटण्यासाठी आले. तेव्हा गावातील काही तरुणांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिले. यानंतर त्यांचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. यानंतर या दोघांना बांबूच्या झाडाला बांधून मारहाणदेखील केली. यानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली. यामध्ये काही लोकांचं म्हणणे होते कि, दोघांचंही लग्न लावून द्या तर काही लोकांचं म्हणणं होतं की त्यांना आर्थिक दंड ठोठावला जावा. मात्र शेवटी या दोघांचीही जात वेगळी असल्याने त्यांचे लग्न न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक दंड ठोठावून मुलाला सोडून देण्यात आले.

Leave a Comment