हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमदार विनायक मेटे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नसेल अशी उपरोधिक टीका आमदार विनायक मेटे यांनीशरद पवारांवर यांच्यावर केलीये.
शरद पवार शेतकरी आंदोलनाबाबत राष्ट्रपतींना भेटतात, विरोधकांना एकत्र करतात मात्र त्यांना मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही अशा शब्दात मेटे यांनी पवारांवर टिका केलीय. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी समाजातील नेत्यांची तात्काळ बैठक बोलवावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केलीय. राज्यात कायदा खुंटीला टांगून निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे MPSC च्या परीक्षेत केलेले बदल आहेत. मुख्यमंत्र्यांनी MPSC मंडळातील अधिकाऱ्यांना लाथ मारुन हाकलून द्यावे. मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतरच भरती प्रक्रिया राबविली जातेय याचाच अर्थ मराठा समाजाला हे सरकार डावलतय असं मेटे यांनी म्हटलंय.
मराठा आरक्षण मिळवून देण्याची जबाबदादी सत्ताधारी पक्षांची असतेच याविषयावर एकमेकांकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळाले आता ते आरक्षण चुकीचे दिल्याची चर्चा काही सत्ताधारी नेते करीत आहेत. मग त्यावेळी त्यात दुरूस्ती का सुचविली नाही.असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’