देवेंद्र फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री : विनायक मेटे

0
60
Vinayak Mete Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. “अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस भेटले नाहीत, रात्री वेशांतर करून रणनीती करायचे. पण शेवटी स्वतःचं सरकार आणून दाखवलं. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत,” असे विधान मेटे यांनी केले आहे.

विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील एका कार्यक्रमास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी श्री. मेटे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाची मागणी कोणीही पाहिली नाही. मात्र, फडणवीसांनी त्यांच्या सरकारमध्ये आरक्षण देण्याचे काम केले. मागील सरकार हे नालायक होते. त्यांनी एकाही समाजाला न्याय दिला नाही. गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार केला. आपल्याला कोणी न्याय देणारे असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत.

आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. कारण त्यांनी आम्हाला सरकारमध्ये घेण्याचा शब्द दिला होता. तो जरी त्यांनी पाळला नसला तरी आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. फडणवीसजी तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे, असे मेटे यांनी म्हंटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here