हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये. आम्हीही कसे पुरून उरू शकतो हे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले आहे,” असा इशारा राऊतांनी दिला.
नितेश राणे कणकवली कोर्टापुढे हजर झाल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, आज नितेश राणे कणकवली कोर्टासमोर हजर झाले आहे. हि चांगली घटना आहे. कायदा आणि न्यायालय हे यापुढच्या गोष्टी पाहतील. नितेश राणे यांनी जो समय बलवान है असे सूचक ट्विट केले आहे आणि इशारा दिला आहे. त्याबाबत सांगायचे झाले तर केंद्र सरकारच्या सत्तेचा कोणी दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारलं;आ कोणी घाबरवण्याचा प्रयत्न करू नये.
सरकारी यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणे, न्यायालईन कामकाजातहस्तक्षेप करण्याची पद्धत हि भाजपची आहे. हि महाविकास आघाडीची पद्धत नाही. कायद्याला कायद्याचे काम करू दे आणि न्यायालय त्याच्या पद्धतीने निर्णय देईल. आम्ही सर्व मंडळी न्यायालयाचा आदर करणारी आहोत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.