होय आम्हीच नारायण राणेंविरोधात तक्रार दिली – विनायक राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज सकाळी कणकवली पोलिसांनी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, ते हजर राहिले नसल्याने पोलिसांनी राणेंच्या घरावर नोटीस चिकटवली. या प्रकाराबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत. त्याला लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी आणि नितेश राणे कुठे आहेत याची माहिती घेऊन . तसेच आरोपीला पकडावे अशी मागणी करत आम्हीच राणेंच्या विरोधात तक्रार दाखल केली, असे राऊत यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “कणकवली येथील शिवसेना उप जिल्हाप्रमुख सचिन सावंत आणि पदाधिकारी राजू राठोड यांनी कणकवली पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी त्यांना माध्यमांनी नितेश राणे कुठे आहेत? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का? असे म्हंटले होते. त्यांच्या या उत्तरावरून नितेश राणे कुठे आहेत हे नारायण राणे यांना 100 टक्के माहिती आहे. केंद्रातील मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत, लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी आणि नितेश राणे कुठे आहेत याची माहिती घ्यावी. तसेच आरोपीला पकडावे, अशी मागणी आम्ही केली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Leave a Comment