हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात पुष्कळ प्रकारचे प्राणी आढळतात, त्यातील काही असे आहेत की ज्याची माहिती माणसाला सुद्धा नसते आणि यामुळे बर्याच वेळा ते फसले जातात. आजकाल अशाच एका प्राण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे, ज्याला लोक त्याला साप समजत होते मात्र प्रत्यक्षात तो साप नव्हता. हा प्राणी पाहून तुम्हीही फसाल आणि तुम्हीसुद्धा त्याला सापच समजाल. मात्र जेव्हा आपण हा संपूर्ण व्हिडिओ पहाल तेव्हा आपल्याला त्याचची वास्तविकता कळेल. हा आश्चर्यकारक प्राणी दगडावर रेंगाळताना दिसला. लोकांना सुरुवातीला तो साप वाटला, मात्र व्हिडिओ जसा पुढे सरकला तसा तो वेगळाच प्राणी दिसून आला. लोकांनी असा प्राणी पहिल्यांदाच पाहिला.
वास्तविक, ज्या प्राण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे व्हिडीओ मध्ये त्याचे पाच हात दिसत आहेत, जो एकदम सापासारखच दिसतो. सुरवातीला तो दगडावर रेंगाळतो आणि हळू हळू पाण्याकडे जातो. ट्विटरची यूझर लिडिया राले यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे काय आहे ??’ . हा एक जुना व्हिडिओ आहे जो यापूर्वी देखील सोशल मीडिया केला गेला आहे. हा व्हिडिओ 4 जून रोजीच शेअर करण्यात आला होता, आतापर्यंत सुमारे याला 3 लाख व्युज मिळालेली आहेत. तसेच, या व्हिडिओवर हजारो युझर्सनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बरेच लोक या प्राण्याला साप मानत आहेत आणि जेव्हा हा व्हिडिओ पुढे सरकतो तेव्हाही त्यांचा गोंधळ वाढू लागतो, एका यूझरने लिहिले, ‘हे ऑस्ट्रेलियनसारखे काहीतरी आहे’.
what is that?? pic.twitter.com/weeDnmHVwL
— Lydia Raley (@Lydia_fishing) June 4, 2020
अशा आल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया
त्याचवेळी दुसर्या एका यूझरने लिहिले की, ‘हे वर्ष 2020 देखील धोकादायक दिसत आहे’. दुसर्या यूझरने त्याला स्नेक स्पायडर असे म्हटले आहे … त्याच वेळी अनेक युझर्स हे वेगवेगळ्या कमेंट्सही देत आहेत. पण शेवटी काही लोकांना कळले की हा प्राणी कोण आहे. हा प्राणी एक ब्रिटल स्टार किंवा ओफियोरोइड आहे. ब्रिटल स्टार हा समुद्रातील एक प्राणी आहेत जो स्टार फिशसारखा दिसतो. त्यांना सरपेंट स्टार्स असे देखील म्हणतात. या ब्रिटल स्टार्सच्या जगभरात दोन हजाराहून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी बरेच खोल समुद्रात आढळतात. ते लांब हात वापरून समुद्राच्यवर तरंगतात
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.