…अन गर्भवती महिलेने दिला रस्त्यावरच मुलाला जन्म, पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या झेजियांग प्रांतात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक गर्भवती महिला काही कामानिमित्त बाजारात गेली होती आणि परत जात असताना अचानक तिने रस्त्यावरच मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना जवळच्याच दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या महिलेची ही पहिलीच गर्भधारणा होती आणि या घटनेच्या वेळी फक्त तिचा वृद्ध काकाच तिच्यासोबत उपस्थित होता. त्या महिलेने मुलाला जन्म देताच ती रस्त्यावर पडली, त्यानंतर व्हिडिओमध्ये ती महिला रडताना दिसत आहे. यावेळी तेथील आजूबाजूचे काही रहिवासी त्या महिलेला मदत करतानाही दिसत आहेत, तर काही जण संपूर्ण घटना पाहिल्यानंतर निघून गेले. प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की ही महिला रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करत असताना जवळपास १० वाहनांनी तिला रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

https://youtu.be/SgZvkRZUlQk

महिला आणि मूल दोघेही सुखरुप आहेत
चीनमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना ४ मे रोजीची आहे आणि त्या महिलेचे नाव चेन असे सांगितले जात आहे. चेनने सांगितले की तिला एक मुलगा झाला आहे आणि तो आता पूर्णपणे ठीक आहे. चेनने कबूल केले की त्यावेळी एका क्षणी तिला असे वाटले होते की आता आपल्या मुलाला वाचवणे शक्य नाही.तिने सांगितले की मला काहीच समजू शकले नाही आणि अचानक वेदना सुरू झाल्याच्या १० मिनिटातच माझी प्रसूती झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर बऱ्याच महिलाही कमेंट करत ​​आहेत. एका महिलेने लिहिले की माझ्या प्रसूतीसाठी काही तास लागले, चेन भाग्यवान आहे की हे सर्व काही इतक्या लवकर झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment