मुंबई प्रतिनिधी | ‘मी फेडरर ला याआधीही एकदोन वेळा भेटलो आहे. मात्र यावेळचा अनुभव विलक्षण होता. फेडरर ला आमची पुर्वी झालेली भेट आठवत होती हे एकुण मी अचाट झालो’ असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. ‘स्काय स्पोर्ट’ या वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने या फेडरर सोबतच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.
काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का यांनी टेनिसपटू रॉजर फेडरर याची आॅस्ट्रेलीयात भेट घेतली होती. अॉस्ट्रेलियन ओपनदरम्यान झालेल्या या भेटीत नक्की काय चर्चा झाली याची उत्सुकता विराटच्या चाहत्यांना लागली होती. विराटने आज यावर भाष्य केले. फेडररसारख्या सर्वात यशस्वी टेनिसपटूने आपल्याला लक्षात ठेवावे याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर लपून राहिलेला नव्हता.
विराट म्हणाला की फेडररनेच आठवण करुन दिली की काही वर्षांपूर्वी आपण सिडनीत भेटलो होतो. हे ऐकल्यावर तर मी उडालोच. व्वा..व्वा! त्याला मी आठवतोय. ही भावनाच शब्दात व्यक्त न करता येणारी आहे. मी लहान असल्यापासून त्याचा खेळ बघत आलोय. तो केवळ एक महान आणि यशस्वी टेनिसपटूच नाही तर एक चांगला माणूससुध्दा आहे.
दरम्यान, विराट आणि फेडरर च्या भेटी वेळी त्यांच्यात खेळावर चर्चा झाली. त्यांचे रोजचे काम म्हणजे खेळ आणि खेळाच्या तंत्राबद्दल सखोल चर्चा झाली. कोहली म्हणाला की तो मला प्रश्न विचारत राहिला. आम्ही खेळांवेळच्या मनस्थिती आणि विचारसरणीची चर्चा करत राहिलो. तो कशी तयारी करतो, त्याला त्याच्या खेळाबद्दल काय वाटते याबद्दल चर्चा झाली. फार सुंदर चर्चा झाली. चांगला वेळ गेला.
इतर महत्वाचे –
हार्दिक पांड्या करणार आता बँकिंग परीक्षेचा अभ्यास ??